0

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात आतापर्यंत ज्या रिपोर्ट्स समोर आल्या आहेत, त्यात सुशांतने आत्महत्या केल्याची पुष्टी झाली आहे. आता पोलिसांनी सुशांतने गळफास घेतलेल्या कपड्याला परीक्षण करण्यास पाठवले आहे. कपड्याची टेन्सिल टेस्ट होईल. याद्वारे माहिती मिळवली जाईल की, तो कपडा सुशांतचे वजन पेलू शकत होता, का नाही.

हिरव्या नाइटगाउनने घेतला गळफास

पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरून कोणतीच सुसाइड नोट मिळाली नाही. सुशांतने 14 जूनला आपल्या घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली. गळफास घेण्यासाठी त्याने नाइटगाउनचा वापर केला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक हिरव्या रंगाचा नाइटगाउन दिसत आहे.

3 दिवसात येईल रिपोर्ट

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी हा नाइटगाउन केमिकल आणि फॉरेन्सिक परीक्षणासाठी फॉरेन्सिक सायंस लॅबोरेट्री कलिनामध्ये पाठवला आहे. कपड्यांच्या टेन्सिल टेस्टची रिपोर्ट सोमवारपर्यंत येईल. पोलिसांनी सांगितले की, मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी, फॉरेंसिक जानकार  सुशांतच्या गळ्यावरील निशानांचे परीक्षण करेल.

काय आहे टेन्सिल टेस्ट

टेन्सिल टेस्टद्वारे कोणत्याही पदार्थाची भार सहन करण्याची क्षमता पाहिली जाते. एखादा पदार्थ न तुटता, किती ताणला जाऊ शकतो, याचा तपास डेन्सिल टेस्टद्वारे केला जातो. सुशांतचे वजन 80 किलो होते. सुशांतच्या मोबाइल फोनची फॉरेन्सिक रिपोर्ट येणेही बाकी आहे. एफएसएलकडून रिपोर्ट येण्यास 8 ते 10 दिवस लागतात. हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे एक्सपर्ट कोणतीच घाई करणार नाहीत.

Post a comment

 
Top