0

काेरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अमेरिकेतील डझनावर राज्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची चिन्हे आहेत. अॅरिझोनामध्ये सरकारने बार, जिम, सिनेमागृह, वॉटर पार्क ३० दिवसांसाठी पुन्हा बंद करून टाकले आहेत.

येथे सार्वजनिक कार्यक्रमांतही ५० हून जास्त लोकांना सहभागी होत येणार नाही. गव्हर्नर डोग डाॅकी यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे. अॅरिझोनामध्ये आतापर्यंत ७६ हजार ९८७ रुग्ण आढळून आले आहेत, तर १ हजार ५८८ जणांचे प्राण गेले आहेत. येथे सात दिवसांपासून सातत्याने ३ हजारांहून जास्त नवे रुग्ण येत आहेत. गेल्या आठवड्यात याच आशयाचे काही व्हिडिआे समोर आले होते. त्यात अनेक वेळा लोक बार, रेस्तराँमध्ये विनामास्क दिसून आले होते. त्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. फ्लोरिडानेदेखील आपल्या दक्षिणेकडील सागरकिनारी ४ जुलै भटकंतीवर बंदी घातली आहे. सूत्रांच्या मते, सरकार हा निर्णय पुढेही लागू करण्याची शक्यता आहे. फ्लोरिडामध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार ३४१ रुग्ण आढळून आले. ३ हजार ४४७ जणांचा मृत्यू झाला. टेनेसीमध्ये आणीबाणी २९ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. जॉर्जियात लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्याची योजना आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सीत रेस्तराँमध्ये खाण्यापिण्यावर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे.

Post a comment

 
Top