
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा केली. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थिती होणार हा सोहळा यावर्षी कोरोना संकटामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थिती पार पडला. यंदाचा मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरात पाहारा देणाऱ्या पाथर्डी येथील विणेकरी विठ्ठल नामदेव बडे यांना मिळाला. या महापूजेला यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थिती होते.
"मी येथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगाच्या वतीने विठुरायाच्या चरणी साकडं घालायला आलो आहे आणि साकडं घातलं आहे. आजपर्यंत आपण अनेकवेळा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे”. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे विठुरायाच्या चरणी साकडं घातलं."
Post a Comment