
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना आणि अर्थव्यवस्थेबाबत सूचना दिल्या. राहुल म्हणाले की कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे गरीब, मजुर आणि मध्यमवर्गीयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यांच्यासाठी सरकारने 6 महिन्यांसाठी 'न्याय' सारखी योजना आणावी. याअंतर्गत गरीब कुटुंबाच्या खात्यात दर महिन्याला 7 हजार 500 रुपये द्यावेत.
राहुल म्हणाले की, यामुळे मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येईल. मात्र, सरकारने तीन-चार वेळा यास नकार दिला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, पैसा नाहीये. परंतु मी आठवण करून देतो की, सरकारने 15 बड्या उद्योगपतींचा कोट्यावधी कोटींचा कर माफ केला आहे.
राहुल यांनी चिनी आयातीच्या मुद्यावरून देखील सरकारला घेरले
काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी चीनच्या आयातीच्या मुद्द्यावर सरकारला घेरले आहे. ते म्हणाले की, भाजप मेक इंडियाची चर्चा करतो, पण चीनकडून वस्तू खरेदी करतो. राहुल यांनी ट्विटरवर दोन आलेख सामायिक केले आहेत, ज्यात मनमोहन आणि मोदी सरकारच्या काळात चीनकडून होणाऱ्या आयातीची टक्केवारी दाखवली. ते म्हणाले की ही आकडेवारी खोटी नसते.
Post a Comment