0

राज्यात रविवारी ६,५५५ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर ३,६५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दिवसभरात १५१ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ६ हजार ६१९ वर गेली असून त्यापैकी १ लाख ११ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण ५४.०८ टक्के आहे. सध्या ८६ हजार ४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मृतांची एकूण संख्या ८ हजार ८२२ झाली आहे.

पुणे विभागात वीस हजार कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; ३३ हजार ८५७ बाधितांची नाेंद

पुणे विभागात वीस हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ८५७ इतकी आहे. ॲक्टिव्ह रुग्ण १२ हजार २९१ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण एक हजार २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारअखेर ६१७ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. मृत्यूचे प्रमाण ३.६२ टक्के तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.०८ टक्के इतके असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी रविवारी दिली.

पुणे जिल्ह्यातील २८ हजार ४७ बाधित रुग्ण असून, १६ हजार ७२३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजार ४६७ आहे. कोरोनाबाधित एकूण ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४६३ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आजपर्यंत विभागामध्ये एकूण दोन लाख २ हजार ४०७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ९७ हजार ६१७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. चार हजार ७६० नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

प्राप्त अहवालांपैकी एक लाख ६३ हजार ४३४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून ३३ हजार ८५७ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.


पुणे विभागातील स्थिती

> सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित एक हजार ३०४ रुग्ण असून ७८४ बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

> सोलापूर जिल्ह्यात तीन हजार १०२ कोरोनाबाधित रुग्ण असून एक हजार ८३४ बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

> सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित ४६३ रुग्ण असून २६२ बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

> कोल्हापूर जिल्ह्यात ९४१ कोरोनाबाधित रुग्ण असून ७३८ बाधित रुग्ण बरे झाले आहेत.


नाशिक शहरात रविवारी सर्वाधिक १६१ नवीन पॉझीटीव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यात विशेषत: शहरात कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा अत्यंत चिंता व्यक्त करत असला तरीही रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याचा दिसालाही एका बाजूने मिळत आहे. रविवारी (दि.५) जिल्ह्यात २०४ नवे पॉझीटीव्ह आढळून आले. पण १६५ जण बरे होऊन घरीही परतले. जसे एकाच दिवसात सर्वाधिक १६१ नाशिक शहरातील नवे रुग्ण आहेत, तसेच १२७ बरे होणारे देखील नाशिक शहरातीलच रुग्ण आहेत.

आतापर्यंत बाधितांचा जिल्ह्याचा आकडा ५ हजार ३९१ इतका असून त्यापैकी २ हजार ६२ जण म्हणजे तब्बल ५६.०६ टक्के रुग्ण बरे होत आहे. यातील सर्वाधिक बरे होणारे ८७६ म्हणजे ८०.६६ टक्के रुग्ण हे मालेगावमधील तर २ हजार ९४२ पैकी १२६६ म्हणजे ४७.५३ टक्के रुग्ण नाशिक शहरातील आहे.

दिवसभरात नाशिक जिल्ह्यात तब्बल ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ५ नाशिक शहरातील आणि २ ग्रामीणचे आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आता २७७ इतकी झाला असून यातही नाशिक शहरातील मृतांचीच संख्या सर्वाधिक म्हणजे १३२ ऐवढी आहे. म्हणजे रुग्णांची झपाट्याने होणारी वाढ नाशिक शहरातच अधिक आहे. बरे होणाऱ्यांची संख्या सध्या नाशिक शहरातच सर्वाधिक आहे.

Post a comment

 
Top