0

भारतात टेलिव्हिजनची दुनिया बदलणारी आणि एकता कपूरला छोट्या पडद्याची राणी बनवणाऱ्या मालिकांपैकी एक 'क्योंकि सास भी कभी बहु थी' मालिकेला शुक्रवारी (3 जुलै) 20 वर्ष पूर्ण झाले. या अनुषंगाने मालिकेची निर्माती एकता कपूरने इंन्स्टाग्रामवर या मालिकेविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या. ही पहिली मालिका आहे ज्यासाठी चॅनेलने मागणी केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे दिल्याचे एकताने यावेळी सांगितले. 

आपल्या पहिल्या पोस्टमध्ये एकताने लिहिले की, "क्योंकि सास भी कभी बहू थी"चे 20 वर्ष...मला आठवते की, मी नर्व्हस होऊन समीर सर आणि तरुण यांना या मालिकेविषयी सांगत होते. ती त्याला सांगत होते की, 'सास-बहू' ड्रामा काम करू शकते... आणि आम्ही ते 1 लाख रुपयांमध्ये करण्यास तयार होतो.'


तरुणने भाव ठरवण्यासाठी आईला फोन केला होता

'नंतर तरुणने माझ्या आईला फोन केला आणि म्हणाला 'मी भाव करण्यासाठी फोन केला आहे...' माझी आई म्हणाली, आम्ही 1 लाखपेक्षा कमी पैशात नाही करू शकत...'यानंतर तो म्हणाला, 'समीर नायर सांगितले की, यासाठी आम्ही तुम्हाला 1.40 लाख रुपये देऊ...'कृपया तुम्ही या मालिकेवर खर्च करा.' 

टीव्ही इतिहास पहिल्यांदाच असे घडले होते

एकताने पुढे लिहिले की, 'एका चॅनेलने भाव केला असेल आणि जास्तीचे पैसे दिले असे याआधी कधीच झाले नव्हते. कारण त्यांना चांगली गुणवत्ता हवी होती. पण तो चॅनेलचा दृढ विश्वास आणि समर्थन होते जे त्याने आम्हाला दिले होते. पहिल्यांदाच एखादा डेली सोप प्राइम टाइमवर होता आणि इतिहास घडवत होता.' यानंतर एकताने समीर सर, तरुण कटियाल, मालिकेची संपूर्ण कास्ट आणि क्रू टीम, मोनिषा आणि स्टार प्लसचे आभार व्यक्त केले.

Post a comment

 
Top