0

सरकारने चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. 2017 मध्ये डोकलाम वादादरम्यान संरक्षण मंत्रालयाने चीन सीमेवर तैनात सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना 42 चायनीज अ‍ॅप्स डिलीट करण्याचे आदेश दिले होते. या अ‍ॅप्समुळे देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे सांगण्यात आले होते.

संरक्षण मंत्रालयाने 24 नोव्हेंबर 2017 ला एक आदेश जारी करुन 42 अ‍ॅप्स डिलीट करुन फोन फॉर्मॅट करण्यास सांगितला होता.

2017 मध्ये जून ते ऑगस्टपर्यंत भारत आणि चीनदरम्यान डोकलाम वाद सुरू होता. यादरम्यान, चीनी अ‍ॅप्ससंबंधित इंटेलिजेंस इनपुट मिळाली होती. यानंतर हे अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले होते. डोकलाममध्ये चीन सीमेजवळ एक रस्ता बनत होता. भारतीय सैनिकांनी हे काम थांबवले होते.

2017 मध्ये संरक्षण मंत्रालयाकडून जारी लिस्टमध्ये 42 अ‍ॅप्स होते. यात वीबो, वी चॅट मैसेन्जर, शेअरइट आणि यूसी ब्राउजरदेखील सामील होते. सोमवारी ज्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, त्यात हे नावही सामील आहेत. यावर्षी जूनच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने एक अ‍ॅडवायजरी जारी केली होती. याला रॉ (रिसर्च अ‍ॅड अ‍ॅनॉलिसिस विंग) आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गेनायजेशन (एनटीआरओ) च्या इनपुटच्या आधारावर तयार केले होते. ज्या अ‍ॅप्सला सरकारने बंदी घातली आहे, त्यात अॅंटी व्हायरस आणि ब्राउजरदेखील सामील आहेत.

Post a Comment

 
Top