0
सोलापूरजम्मू-काश्मीरच्या पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटे चकम झाली. यामध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान येथे दशहतवाद्यांविरोधात लढत असताना महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले आहे. पुलवामामध्ये झालेल्या चकमकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे CRPF जवान सुनिल काळे यांना वीरमरण प्राप्त झाले.
न्यूज एजेंसीनुसार, सुरक्षादलाला पुलवामाच्या बंदजू परिसरात जवळपास 5 दहशतवादी लपले असल्याची सूचना मिळाली होती. यानंतर पोलीस आणि सीआरपीएफने या परिसरात शोध मोहिम सुरू केली. दरम्यान दरशतवाद्यांनी फायरिंग करण्यास सुरूवात केली.
दरम्यान दहशतवाद्यांशी दोन हात करताना सोलापूर जिल्ह्यातील सुनील काळे हे धारातिर्थी पडले. सुनिल काळे हे आज पहाटे 4.30 वाजता झालेल्या चकमकीत शहीद झाले. सुनिल काळे यांच्या शहीद होण्याच्या वृत्तानंतर गावावर शोककळा पसरली आहे. तर काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

 
Top