0
कोचीन
केरळमधल्या कोचीन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजनाची परवानगी मागितली होती. आपले विद्यापीठ हे धर्मनिरपेक्ष आहे अशी बांग ठोकत कुलगुरुंनी या पूजेला परवानगी नाकारली आहे. या विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या काही उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी विद्येची देवता असलेल्या सरस्वतीचे पूजन करण्याची परवानगी मागितली होती. यावर विद्यापीठाने दिलेल्या उत्तरात म्हटलंय की ‘हे विद्यापीठ धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे या विद्यापीठाच्या आवारामध्ये कोणत्याही धार्मिक विधींना परवानगी देता येणार नाही’

25 जानेवारी रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान कोचीन विद्यापीठाच्या कुट्टनाड कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना पत्र लिहलं होतं, ज्यामध्ये त्यांनी वसंत पंचमीनिमित्त आपल्याला सरस्वती पूजन करायचे आहे, आणि त्यासाठी 9 आणि 11 फेब्रुवारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. ही पूजा करण्याची ही परवानगी मागण्यात आली होती.कुलुगुरूंनी हे विद्यापीठ धर्मनिरपेक्ष असल्याने पूजेची परवानगी नाकारत असल्याचे सांगितले.

उत्तर भारतामध्ये वसंत पंचमीलवा सरस्वती पूजा केली जाते. या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजेला उत्तरेकडच्या राज्यामध्ये मोठं महत्व असतं. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी ही परवानगी मागितली होती. मात्र धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ही परवानगी नाकारण्यात आल्याने विद्यार्थी निराश झाले आहेत.Post a comment

 
Top