0
नवी दिल्ली :

माजी सीबीआय प्रमुख अशोक वर्मा यांची केंद्र सरकारने बदली केल्याने नवीन सीबीआय प्रमुख निवडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने ५ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. या संदर्भातील निवडसमितीची बैठक आज होणार आहे. या निवडसमितीत पंतप्रधानांसह विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांचा समावेश आहे.


१९८३ ते १९८५ आयपीएस बॅच दरम्यानच्या ८० पात्र अधीकाऱ्यांच्या यादीतून ३० जणांची यादी शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. त्यातील आणखी ५ नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. आज होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या निवडसमितीची ही दुसरी बैठक आहे.  या शार्टलिस्ट केलेल्या पाच जणांच्या यादीत मध्यप्रदेशचे पोलिस महासंचालक  ऋषी कुमार शुक्ला, सीआरपीएफ प्रमुख आर. आर. भटनागर, एनएसजी प्रमुख सुदीप लाखताकिया, फॉरेन्सिक डायरेक्टर जावेद अहमद आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंट विंगचे प्रमुख ए.पी. महेश्वरी यांची नावे आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि निवड समितीतील सदस्य खरगे यांनी निवड प्रक्रियेबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Post a comment

 
Top