0
आमिरसोबतच्या नात्यामुळेच फातिमाला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'सारख्या बिग बजेट चित्रपटात भूमिका मिळाली अशीही चर्चा होती.

दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर अभिनेता आमिर खान आणि या चित्रपटातील त्याची सहकलाकार अभिनेत्री फातिमा सना शेख या दोघांच्या नात्याविषयी चर्चा होऊ लागल्या. फातिमा आणि आमिर यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. ‘फिल्मफेअर’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फातिमा या चर्चांवर मनमोकळेपणे बोलली. सुरुवातीला या सर्व चर्चांचा तिच्यावर कसा परिणाम झाला आणि नंतर त्यांना ती कसं दुर्लक्ष करायला शिकली हे तिने यावेळी सांगितलं.
‘इंडस्ट्रीत नवीनच असल्याने मला सुरुवातीला अशा चर्चांवर काय म्हणायचं हेच कळत नव्हतं. अशा गोष्टींना मी कधीच सामोरे गेले नव्हते,’ असं ती म्हणाली.

आमिरसोबतच्या नात्याची चर्चा खोटी असल्याचं स्पष्ट करत ती पुढे म्हणाली, ‘माझ्याविषयी अशा बातम्या वाचणाऱ्यांना मी किती वाईट मुलगी आहे असंच वाटत असेल. माझ्याबद्दल लोकांनी चुकीचे पूर्वग्रह ठेवले तर त्याचा मला खूप त्रास होतो. मी खरंच हरामी असेन तर लोकांना सत्य काय ते कळू दे. पण जर मी नाहीये तर त्यांनी मला वाईट व्यक्ती म्हणून पाहावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. हळहळू मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकू लागेल आहे. पण हो, मला या गोष्टींचा सुरुवातीला खूप त्रास झाला होता.’

आमिरसोबतच्या नात्यामुळेच फातिमाला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’सारख्या बिग बजेट चित्रपटात भूमिका मिळाली अशीही चर्चा होती. आमिरसोबतचं फातिमाचं नातं खुद्द आमिरची पत्नी किरण रावनंही फेटाळून लावलं होतं. आमिरव्यतिरिक्त फातिमाचं नाव अपारशक्ती खुरानासोबतही जोडलं गेलं. अपारशक्तीनं दंगल चित्रपटात फातिमाच्या भावाची भूमिका साकारली होती. जुलै महिन्यात या दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहण्यात आलं होतं. मात्र अपारशक्तीसोबतच्या नात्याबद्दलच्या चर्चाही फातिमानं फेटाळून लावल्या.

Post a comment

 
Top