0
पुणे : महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या असतील, तर त्यासाठी बारामती जिंकावीच लागेल. तेथे विजयी मिळाल्यानंतरच ४५ जागा होतील, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.

शक्ती केंद्र संमेलन आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुणे, बारामती आणि शिरूर या मतदारसंघांबाबत आढावा घेतला. यासह मोदी सरकारने केलेल्या योजनांविषयी माहिती देत विरोधकांवर जोरदार टीका केली
.
शहा म्हणाले, की अयोध्येत त्याच जागेवर लवकर भव्य राम मंदिर होणारच, त्यासाठी भाजप कटीबद्ध आहे. अयोध्येत मंदीर बांधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी राम मंदिराविषयी भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांच्या आघाडीकडे ना नेता, ना नीती आहे. देशात मजबूत सरकार केवळ मोदीच देऊ शकतातPost a comment

 
Top