0
कोलकाता:पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळी घालून हत्‍या करण्यात आली आहे. सत्यजीत बिश्वास असे हत्‍या झालेल्‍या आमदाराचे नाव आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली. दरम्यान, सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे.
सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातून निवडून आले होते. ते फुलबाडी परिसरात एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम सुरु असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्‍यानंतर त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून करण्यात अल्‍याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. ‘‘सत्‍यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात आहे. तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपच्या या कामासाठी मदत केली आहे. भाजपच्या कृत्यांना जनता योग्य उत्तर देईन.’’ असे ट्विट तृणमूल काँग्रेसने केले आहे. 

Post a comment

 
Top