0
बॉक्स ऑफिसवर सध्या बायोपिक जोरात चालत असले तरी या सगळ्यांमध्ये बाजी मारली आहे ती हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाने. महाराष्ट्रासह देश-विदेशात हा चित्रपट 25 जानेवारी रोजी ढोल-ताशांचा गजर आणि भव्य मिरवणुकांसह दणक्यात प्रदर्शित झाला. इतक्या जोश-जल्लोशात-दणक्यात याआधी कोणताही बायोपिक झळकलेला नाही.

संभाजीनगरमध्ये आज सकाळपासून विविध विभागातून ढोल ताशांचा गजरात आणि भव्य मिरवणुका काढून शिवसैनिकांसह शहरातील नागरिक ‘ठाकरे’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांत पोहोचले. अनेक चित्रपटगृहांची प्रवेशद्वारं भगव्या रंगात रंगून गेल्याचे पाहायला मिळत आहे. संभाजीनगरमध्ये पहिल्या दिवशी 37 शो होणार आहेत. यापैकी जवळापास 25 शो हाऊसफुल झाले आहेत.
sambhajinagar-shivsena

Post a Comment

 
Top