0
अरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवारअरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवार

ठळक मुद्दे
IL&FS या कंपनीला AAA अर्थात गुंतवणुकीस सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त आहे.
IL&FS ला कर्ज दिलेल्या काही बँकासुद्धा बुडण्याची शक्यता 
मुंबई :लाखो पगारदार मध्यमवर्गीयांचा आधार असलेली भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतनाची हजारो करोडाची रक्कम बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शियल सर्विसेस (IL&FS) या ग्रुपमध्ये जवळपास १५ ते २० हजार कोटीच्या भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतनाच्या निधीची गुंतवणूक करण्यात आलेली असून आता ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

गुंतवणूक तज्ञांच्या मते, IL&FS वर ९१ हजार कोटीचे कर्ज आहे. यामुळे त्यांना कर्ज स्वरुपात निधी देणाऱ्यांना याचा फटका बसू शकतो. रेग्युलेटरी फाइलिंगच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, IL&FS कडे ९१ हजार कोटीचे कर्ज असून यातील ६१ टक्के रक्कम बँकेची आहे तर उर्वरित रक्कम कर्जरोखे आणि कमर्शिअल दस्तावेजावरील कर्जातून मिळालेली आहे. तसेच भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्समधील एकूण रक्कमेचा अधिकृत आकडा अद्याप सांगता येत नसला तरी ही रक्कम IL&FS ला बँक, म्यूचुअल फंड आदी योजनांकडून प्राप्त निधीपेक्षा भिन्न आहे. यामुळे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक झालेल्या २० हजार कोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

AAA मुळे झाली गुंतवणूक 
IL&FS या कंपनीला AAA अर्थात गुंतवणुकीस सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त आहे. तसेच अशा कंपनीमधील गुंतवणूक चांगला परतावा सुद्धा देते. यामुळे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या काही फंड्सने IL&FS चे काही बॉंडस खरेदी केले. मात्र आता ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने या बॉड्सच्या माध्यमातून गुंतवलेली २० हजार कोटीची रक्कम बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.

बँकासुद्धा बुडण्याची शक्यता
IL&FS मध्ये सर्वात जास्त रक्कम येस बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा यांची अडकली आहे. मात्र यात बँकांमध्ये कोणत्या  भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्सची रक्कम अडकलेली आहे याची माहिती अद्याप कळू शकली नाही. एका बँकर तज्ञाच्या मते, 'IL&FS या ग्रुपचे ४० टक्के बॉंड्स हे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्स कडे असण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत IL&FSकडून कुठलीही माहिती मिळू शकली नाही.

The possibility of dip of 20,000 crores of middle class PF | अरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवार


Post a Comment

 
Top