0
मुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहे.
ठळक मुद्दे:

मुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहे.
आज बेस्ट बसचालक आणि वाहकांच्या संपामुळे त्रस्त असलेल्या उद्धव ठाकरे यांनी चक्क लोकलमधून प्रवास केल्याचा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल झाला.
मात्र हे उद्धव ठाकरे नसून त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे.
मुंबई - मुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहे. संपावर तोडगा सलग आठवडाभर सुरू असलेल्या या संपामुळे सर्वसामान्य मुंबईकर आणि चाकरमानी मेटाकुटीस आले आहेत.  मात्र या परिस्थितीतही मुंबईकरांकडून मिश्कील टिप्पण्या करण्यात येत आहेत. आजतर बेस्ट बसचालक आणि वाहकांच्या संपामुळे त्रस्त असलेल्या उद्धव ठाकरे यांनी चक्क लोकलमधून प्रवास केल्याचा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, उद्धव ठाकरे गर्दीने भरलेल्या लोकलमधून प्रवास करत आहेत, असे दिसत आहे. मात्र हे उद्धव ठाकरे नसून त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोखाली मुंबईकरांकडून गमतीदार प्रतिक्रिया येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंसारखी दिसणारी ही व्यक्ती नेमकी कोण? हे समोर आलेले नाही.
Social Viral : Uddhav Thackeray Travel by local train due to best strike | Social Viral: बेस्ट संपामुळे उद्धव ठाकरेंचा ट्रेनने प्रवास 

Post a Comment

 
Top