0

भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी आणि त्यांचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी सतत प्रयत्न करत आहे. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँक सातत्यानं जनजागृती करत असते.SBI ने ट्विट करुन म्हटलं आहे की, बँक ग्राहकांना कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही. युजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, युपीआय पीन याची माहिती बँकेकडून मागितली जात नाही. त्यामुळे यापैकी माहिती विचारणारा फोन कॉल किंवा मेसेज आल्यास माहिती देऊ नका असं बँकेनं ग्राहकांना सांगितलं आहे.ट्विट केल्यानंतर बँकेने टेक्स्ट मेसेजही पाठवले आहेत. यात ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंटच्या नावावर गिफ्ट व्हाऊचर देण्याचा दावा करणाऱ्यांपासून सावध राहण्यास सांगितलं आहे.

ग्राहकांना आपल्या क्रेडिट कार्डची माहिती कधीही द्यावी लागत नाही असाही मेसेज SBI ने पाठवला आहे. बँकेनं टेक्स्ट मेसेजसोबत एक व्हिडिओची लिंक पाठवली आहे. यात लोकांची कशाप्रकारे फसवणूक होते ते सांगितलं आहे.तुमच्या बँक खात्याबद्दलची माहिती एसएमएस किंवा मेल करून कधीही मागितली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेज आणि मेलपासून सावध रहा. जर यातून कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली तर याची तक्रार पोलिसांकडे करा. तसंच बँकेच्या वेबसाइटवर असलेल्या नंबरवर फोन करुन बँकेला माहिती द्या.
SBI ने ग्राहकांना अनोळखी नंबरवरुन डेबिट कार्डची माहिती विचारणारा फोन कॉल आल्यास त्याला माहिती न देता 100 नंबरवर फोन करण्यास सांगा असं म्हटलं आहे.ट्विट केल्यानंतर बँकेने टेक्स्ट मेसेजही पाठवले आहेत. यात ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंटच्या नावावर गिफ्ट व्हाऊचर देण्याचा दावा करणाऱ्यांपासून सावध राहण्यास सांगितलं आहे.तुमच्या बँक खात्याबद्दलची माहिती एसएमएस किंवा मेल करून कधीही मागितली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेज आणि मेलपासून सावध रहा. जर यातून कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली तर याची तक्रार पोलिसांकडे करा. तसंच बँकेच्या वेबसाइटवर असलेल्या नंबरवर फोन करुन बँकेला माहिती द्या.

Post a Comment

 
Top