0
सॅमसंगने शुक्रवारी अनेक स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए७, सॅमसंग गॅलेक्सी ए९ आणि सॅमसंग गॅलेक्सी जे६ च्या सर्व प्रकारातील फोनच्या किंमती कमी केल्या आहेत. जाणून घेऊयात काय आहेत नव्या किंमती...नवी दिल्ली:

सॅमसंग एक दक्षिण कोरियाची फोन उत्पादक कंपनी आहे. तिने आपल्या अनेक स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. आपल्या फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलेक्सी नोट ८ची किंमत १३००० रुपयांनी कमी केल्यानंतर आता कंपनीने तीन कमी किंमतीच्या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए७ (२०१८), गॅलेक्सी ए९ (२०१८) आणि जे६ इन्फिनिटीच्या किंमती कमी केल्या आहेत. या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने अनुक्रमे २३,९९०, ३६,९९० आणि १४,९९० रुपयांत लाँच केले होते.

आता या किंमतीला मिळणार हे फोन्स

मुंबई स्थित किरकोळ व्यापारी असलेल्या महेश टेलिकॉमने घटलेल्या किंमतीबाबत ट्विट करून ही माहिती दिली आहे. या ट्विटनुसार या स्मार्टफोनच्या किंमती घटल्या आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी जे६ (३जीबी + ३२ जीबी) - १०,४९० (जुनी किंमत ११,४९०)
सॅमसंग गॅलेक्सी जे६ (४ जीबी + ६४ जीबी) - ११,९९० (जुनी किंमत १२,९९०)
सॅमसंग गॅलेक्सी ए७ (४ जीबी + ६४ जीबी) - १८,९९० (जुनी किंमत २३,९९०)
सॅमसंग गॅलेक्सी ए७(६जीबी + १२८ जीबी) - २२,९९० (जुनी किंमत २८,९९०)
सॅमसंग गॅलेक्सी ए९ (६जीबी + १२८ जीबी)- ३३,९९० (जुनी किंमत ३६,९९०)
सॅमसंग गॅलेक्सी ए९ (६जीबी + १२८ जीबी) - ३६,९९०( जुनी किंमत ३९,९९०)

गॅलेक्सी नोट ८च्या किंमतीतही घट:

या पूर्वी सॅमसंगने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी नोट ८ ची किंमत पुन्हा एकदा कमी केली आहे. या वेळी सूट मिळाल्यानंतर आता ग्राहकाला हा स्मार्टफोन ४२,९०० रुपयांना विकत घेता येणार आहे. या आधी कंपनीने ऑगस्ट २०१८मध्ये किंमत १२ हजार रुपयांनी कमी केली होती.

मिळवा मोबाइल बातम्या(Mobile Phones News In Marathi)   से  मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट

Post a Comment

 
Top