0
देशाची सेवा करण्याची इच्छा

दिल्ली येथील राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस पथकाचे नेतृत्व करणार आहे. राज्यातील १४ विद्यार्थ्यांही या पथसंचलनात भाग घेणार आहेत. २१ वर्षीय दर्पेश डिंगर हा मूळचा नाशिक नाशिक जिल्ह्यातील तोकडे गावाचा आहे. त्याचे वडिल व्यवसायाने शेतकरी आहेत.

या विषयी दर्पेश डिंगर याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला की, गावांमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. सर्वसाधारण गावची लोकसंख्या आठ हजार असावी. मी लहानपणापासून आजपर्यंत 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला राजपथावर संचलन होतांना टीव्हीवर पाहिले आहे. आपण ही तिथे जाऊन संचलनात सहभागी व्हावे. अशी लहानपणापासून इच्छा आणि एक स्वप्न होते. हे स्वप्न एनएसएसच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. याचा मला खूप आनंद वाटत आहे. आई वडिल शेती करताना अनेक कठीण प्रसंगाला सामोरे गेले आहेत. पण माझ्या शिक्षणाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी शिक्षणासाठी खूप काही केले आहे. मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच तो पुढे म्हणाला की, आमच्या गावामधील कोणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट च्या कार्यक्रमाला दिल्ली येथे गेले नाही. मला तर संचलनाचा मान मिळाला आहे. या गोष्टीचा आनंद घरातील सर्वाना आणि गावातील प्रत्येक व्यक्तीला झाला आहे. अशी भावना त्याने व्यक्त केली. तसेच संचलनात सहभागी होण्यासाठी आता पर्यंत पाच कॅम्पमध्ये सहभागी झाल्यावर संचलनात सहभागी होता आल्याची भावना त्याने व्यक्त केली.

Post a Comment

 
Top