0
बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या महिला चाळीशीत पोहचल्या की त्यांना काम मिळणं कठीण जातं. परंतु, पुरुषांच्या बाबतीत असं होतं नाही. त्यांना चाळीशी पार केल्यानंतरही काम मिळत राहतं. कारण, भारतीय पुरुष
ताजी प्रतिक्रियाधीच म्हातारे होत नाहीत,' असं उपरोधिक वक्तव्य अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्ट हिनं मुंबई
ताजी प्रतिक्रिया
तुझ्या बाबाना तू जवळून पाहिले आहेस त्या मुळे हे मत स्वाभाविक आहे म्हणा......
Abhijit
सर्व कॉमेंट्स पाहाप्रतिक्रिया लिहा

बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या महिला चाळीशीत पोहचल्या की त्यांना काम मिळणं कठीण जातं. परंतु, पुरुषांच्या बाबतीत असं होतं नाही. त्यांना चाळीशी पार केल्यानंतरही काम मिळत राहतं. कारण, भारतीय पुरुष कधीच म्हातारे होत नाहीत,' असं उपरोधिक वक्तव्य अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्ट हिनं केलंय.

पूजा भट्ट हिचा 'सडक २' हा चित्रपट लवकरच येणार आहे. अभिनेत्री म्हणून तब्बल १८ वर्षानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. भारतात पुरुष कधीच वृद्ध होत नाहीत. ते नेहमी जवान राहतात. त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या महिलांना त्यांच्या आईची भूमिका करायला सांगितलं जातं. 'जख्म' चित्रपटात मी अजय देवगणच्या आईची भूमिका साकारली होती. मी अभिनय करणं सोडलं होतं. परंतु, पुरुष एकदा अभिनेता बनला की कायम अभिनेता असतो, हे आता मला समजलं आहे. मला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तर मला आर्किटेक्ट किंवा अॅस्ट्रोनॉट बनायचं होतं, असंही पूजा भट्ट म्हणाली.

संजय दत्त आणि पूजा भट्ट यांचा ९०च्या दशकातील 'सडक' हा चित्रपट हिट ठरला होता. आता पुन्हा 'सडक २' हा चित्रपट येतोय. या चित्रपटात पूजा भट्ट-संजय दत्त यांच्यासोबत आलिया भट्ट आणि आदित्य रॉय-कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट करणार आहेत.

Post a Comment

 
Top