0
नॅपियर : 

ऑस्ट्रेलियात कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने आपले मिशन न्यूझीलंड धडाक्यात सुरु केले. नॅपियरमधल्या पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी किवींच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. कर्णधार केन विल्यम्सनचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना भारतीय माऱ्याचा मुकाबला करणे झेपले नाही. न्यूझीलंडचे फलंदाज एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये पोहचले. शामी आणि कुलदीपच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला ३८ षटकात १५७ धावात गुंडाळले. कर्णधार केन विल्यम्सनच्या अर्धशतकाव्यतिरिक्त (६४) इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले. भारताकडून कुलदीप यादवने ३९ धावा ४ बळी मिळवले तर शामीने १९ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडले. चहलने २ तर केदारने १ बळी मिळवला.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारताच्या जलदगती गोलंदाजांनी सुरुवातच्या काही षटकातच दोन्ही सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि कॉलिन मुनरोला झटपट बाद केले. त्यामुळे विल्यम्सनचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फसला.

भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर थांबू दिले नाही. शामीने सुरुवातीला खिंडार पाडल्यानंतर चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीपुढे किवींनी गुडघे टकले. चहलने रॉस टेलर आणि टॉम लॅथमला बाद करत किवींची मधली फळी पॅव्हेलियनमध्ये पाठवली.

दरम्यान, कर्णधार केन विल्यम्सन एकाकी झुंज देत होता. पण, समोरुन त्याला एकाही फलंदाची साथ मिळत नव्हती. त्यातच केदार जाधवले हेन्री निकोलसला बाद करत किवींचा पाचवा फलंदाज तंबूत पाठवला. ३० षटके झाल्यानंतर  दुसऱ्या स्पेलसाठी शामीला पुन्हा पाचारण करण्यात आले. याही स्पेलमध्ये त्याने आल्या आल्या भारताला विकेट मिळवून दिली. त्याने सँट्नरला १४ धावांवर पायचीत केले.

कर्णधार विल्यम्सन मात्र एकाकी झुंज देत होता. पण, आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कुलदीप यादवला मोठा फटका मरण्याच्या नादात तोही ६४ धावा करुन तोही बाद झाला. त्यानंतर यादवने डग ब्रासवेलला ८ धावांवर बाद करत किवींना आठवा धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवने किवींची शेपूट गुंडाळण्यास फार वेळ लावला नाही. त्याने लोकी फर्गुसनला शून्यावर तर ट्रेंट बोल्टला १ धावांवर बाद केले आणि किवींचा डाव १५७ धावात संपवला.

Live Update :

*भारताची दमदार सुरुवात; ९ षटकात बिनबाद ४१ धावा

*भारताची सावध सुरुवात; ५ षटकात बिनबाद १२ धावा

*भारतासमोर १५८ धावांचे आव्हान 

*टीम इंडियाने किवींना १५७ धावात गुंडाळलेPost a Comment

 
Top