0
रात्री 12 वाजेपासून लागू झाले नवे दर, जाणून घ्या किमती

न्यूज डेस्क - मोदी सरकारने 1 जानेवारी 2019 पासून देशभरात स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच LPGच्या किमती कमी केल्या आहेत. आता सबसिडीवाल्या LPG सिलिंडरची किंमत 5.91 रुपये प्रति सिलिंडर आणि विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 120.50 रुपये प्रति सिलिंडरने कमी झाली आहे. नव्या किमती रात्री 12 वाजेपासून लागू झालेल्या आहेत.
एका महिन्यात दुसऱ्यांदा कपात
एका महिन्याच्या आत सिलिंडरच्या किमतीत दुसऱ्यांदा कपात दिसली. यापूर्वी 1 डिसेंबर रोजी सबसिडीवाल्या LPG सिलिंडरची किंमत 6.52 रुपये प्रति सिलिंडर आणि विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 133 रुपये प्रति सिलिंडरने कमी करण्यात आली होती. तथापि, जून 2018 पासून सातत्याने 6 वेळा LPG चे दर वाढले होते. याबाबत भोपाळमधील रघु इंडेन गॅस सर्व्हिसने सांगितले की, विनाअनुदानित सिलिंडर आता 698.50 रुपयांतच मिळेल. हेच सिलिंडर आधी 818.50 रुपयांत मिळत होते.LPG Cylinder Price Reduced By Rs. 120.50 For Unsubsidised Consumers Rs. 5.91 For Subsidised

Post a Comment

 
Top