0
जीवन वीमा निगमने नुकताच बँकिंग क्षेत्रातही आपलं नाव कोरलं आहे. एका सरकारी बँकेसोबत LIC ने भागीदारी केली आहे
LIC ने नुकताच बँकिंग क्षेत्रातही आपलं नाव कोरलं आहे. जीवन वीमा निगमने एका सरकारी बँकेसोबत भागीदारी केलं असल्याची माहिती समोर आली आहे.
विमा नियमक आणि विकास प्राधिकरणाने LIC ला कोणत्याही एका बँकेसोबत भागीदारी करण्याची मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर LIC ने सरकारी बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या IDBI बँकेचे 82 कोटी 75 लाख 90 हजार शेअर खरेदी केले आहेत. या व्यवहारासोबतच LIC ने बँकेवर मालकी मिळवली आहे.
IDBI बँकेचे साधारण दीड कोटी रिटेल ग्राहक आणि 18,000 कर्मचारी आहेत. बँकेच्या 1800 शाखांमध्ये LIC पॉलसी विकण्यासाठी टच पॉइंटसच्या तत्वाचा वापर केला जाऊ शकतो असं रेग्यलेटरी फाइलिंगमध्ये बँकेनं सांगितलं आहे.
LIC ने IDBI बँकेचे प्रति शेअर 61 रुपयात खरेदी केले आहेत. विमा नियमक आणि प्राधिकरणाने मंजुरी दिल्यावर बँकेनं LIC ला प्रोमोटर रुपात मान्यता दिली आहे.
LIC गेल्या अनेक दिवसांपासून बँकिंग क्षेत्रात आपलं स्थान बनवायचे प्रयत्न सुरू होते. तसेही प्रत्येक सरकारी बँकेमध्ये LIC चा सहभाग आहेच. पण आता IDBI बँकेत जीवन वीमा निगमची विशेष भागीदारी असणार आहे.अर्थशास्त्रज्ञांनुसार हा व्यवहार LIC साठी फायद्याचं नाही. सल्लागारांचे म्हणणे आहे की, पुनर्निमाण आणि विकास आंतरराष्ट्रीय बँकेचं कर्ज जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे याचा संपूर्ण परिणाम LIC वर पडेल. याआधीसुद्धा पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी LIC ला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं होतं.
विमा नियमक आणि विकास प्राधिकरणाने LIC ला कोणत्याही एका बँकेसोबत भागीदारी करण्याची मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर LIC ने सरकारी बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या IDBI बँकेचे 82  कोटी 75 लाख 90 हजार शेअर खरेदी केले आहेत. या व्यवहारासोबतच LIC ने बँकेवर मालकी मिळवली आहे.

Post a Comment

Top