चीनमध्ये नव्या iPhone ला ग्राहक मिळेना! रिटेलर्स देत आहेत तब्बल 13 हजार रुपयांचा डिस्काउंटकमी किमतीमध्ये महागड्या फोनचे फीचर मिळत असल्याने चीनच्या ग्राहकांनी आयफोनकडे पाठ फिरवली.बीजिंग - अॅपल आयफोनचे नवीन मॉडेल एक्सएसला ग्राहक मिळत नाहीत. आयफोनला मागणी कमी होत असल्याचे पाहता चीनमध्ये स्मार्टफोन विक्रेत्यांनी त्याची किंमत 13,440 रुपये (192 डॉलर) कमी केली आहे. चीनमध्ये सर्वात मोठ्या रिटेलर्सपैकी एक सनिंगने 128GB मेमरी असलेल्या iPhone XR ची किंमत 72,520 रुपयांवरून (1,036 डॉलर) 60,060 रुपये (858 डॉलर) केली आहे. एक्सपर्ट्सच्या मते, नवीन आयफोनच्या किमती अधिक असल्याने लोक स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. कमीत-कमी किमतीमध्ये महागड्या फोनचे फीचर मिळत असल्याने चीनच्या ग्राहकांनी आयफोनकडे पाठ फिरवली आहे.
अमेरिकेत iPhone XS चीनपेक्षा स्वस्तच
> चीनमध्ये ऑनलाइन विक्रेत्यांनी सुद्धा आयफोन एक्सआरची किंमत कमी केली आहे. एका सेलरने 256 जीबी मेमरी असलेल्या iPhone XS Max ची किंमत 1,628 डॉलरवरून 1,436 डॉलर केली. तरीही अमेरिकेच्या तुलनेत चीनमध्ये विकल्या जाणारा आयफोन महागच आहे. अमेरिकेत आयफोन एक्सएस मॅक्सची किंमत 1,249 अर्थात चीनच्या तुलनेत 13 हजार रुपयांनी कमी आहे.
> रिसर्च कंपनी काउंटरपॉइंटच्या अहवालानुसार, वार्षिक आकडेवारीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये 2018 मध्ये आयफोनची विक्री एकूणच कमी झाली. 2017 मध्ये याच काळात आयफोनने सर्वात स्वस्त आयफोन 8 लॉन्च केला होता. परंतु, गतवर्षी महागडा एक्सआर मॉडेल आल्याने विक्रीत 5 टक्के घट झाली. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी सुद्धा आयफोनची विक्री घटल्याची कबुली दिली होती. सोबतच, आयफोनचा महसूल 5.5 टक्क्यांनी घटणार असा अंदाज लावला होता. त्यामुळेच आयफोनचे शेअर 10 टक्क्यांनी घसरले होते.

Post a Comment