0
चेतेश्वर पुजाराने मालिकेतील तिसरे आणि करिअरचे 18 वे शतक पूर्ण केले. तो 130 धावांवर नाबाद आहे.

सिडनी - ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताची चांगली सुरुवात झाली. भारताने दिवसअखेर चार विकेट गमावत 303 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने मालिकेतील तिसरे आणि करिअरचे 18 वे शतक पूर्ण केले. तो 130 धावांवर नाबाद आहे. तर मयांक अग्रवालनेही 77 धावा करत मोलाची कामगिरी केली. लोकेश राहुल मात्र पुन्हा अपयशी ठरला आहे. कोहली 23 आणि राहाणे 18 देखिल स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या हेजलवूडने सर्वाधिक दोन तर स्टार्क आणि लियोनने प्रत्येकी एक विकेट घेतली. विराटने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता.


पुजाराने ऑस्ट्रेलिया विरोधात 5 वे कसोटी शतक
पुजाराने ऑस्ट्रेलिया विरोधातील या मालिकेतील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने अॅडिलेड आणि मेलबर्नमध्येही शतक केले. पुजाराच्या करिअरचे हे 18 वे तर ऑस्ट्रेलिया विरोधातील 5 वेश शतक होते. पुजाराने या डावात अर्धशतक आणि शतक दोन्ही चौकार लगावत पूर्ण केले.
first day of fourth test between India vs Australia in Sydney

Post a Comment

 
Top