0
IBPS Calendar 2019: इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएसने 2019 साठी संभावित परीक्षा कॅलेंडर जारी केले आहे. हे कॅलेंडर बँकिंग कर्मचारी निवड संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. जेथे जाऊन हे डाऊनलोड केले जाऊ शकते. या कॅलेंडरमध्ये PO म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर, क्लार्क आणि एसओच्या परीक्षांचे संभावित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. या परीक्षा ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात.

RRBs – CRP RRB-VIII (Officers), CRP RRB-VIII (Office Assistants), PSBs – CRP PO/MT-IX, CRP CLERK-IX आणि CRP SPL-IX परीक्षांच्या संभावित तारखांची माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आली आहे. याशिवाय या पदांसाठी अर्ज प्रक्रियेची माहितीही टाकण्यात आली आहे. जेणेकरून अर्जदाराला कोणतीही अडचण येऊ नये. जर तुम्हालाही हे कॅलेंडर पाहायचे असेल तर आयबीपीएसच्या ऑफिशियल वेबसाइटवर लॉग इन करू शकतात. याशिवाय कॅलेंडरची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे. ज्यावर तुम्ही क्लिक करताच IBPS Calender 2019 पाहू शकाल.

या आहेत परीक्षांच्या संभाव्य तारखा
आयबीपीएस कॅलेंडर 2019 नुसार, आरआरबी-सीआरपीची प्री-परीक्षा 3 ऑगस्टपासून सुरू होईल जी 25 ऑगस्ट 2019 पर्यंत चालेल. तर पीएसबीची प्री-एक्झाम 12 ऑक्टोबरपासून सुरू होऊन 20 ऑक्टोबरपर्यंत चालेल. अधिक विस्ताराने माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.


IBPS Calendar 2019: PO, Clerk and SO Exam Dates 2019 Tentative Schedule Released

Post a Comment

 
Top