0
एम. नागेश्वर राव यांच्या मुलीच्या लग्नात आपण उपस्थिती नोंदवली होती असे कारण त्यांनी दिले.

नवी दिल्ली - सीबीआयचे काळजीवाहू प्रमुख एम नागेश्वरराव यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यापासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एनव्ही रमणा यांनी माघार घेतली आहे. अंतरिम सीबीआय प्रमुखांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका करण्यात आली होती. एकेकाळी एम. नागेश्वर राव यांच्या मुलीच्या लग्नात आपण उपस्थिती नोंदवली होती. त्यामुळे, आपण त्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी घेणे योग्य ठरणार नाही असे जस्टिस रमना यांनी स्पष्ट केले आहे. नागेश्वर राव यांच्या विरोधात सुनावणी घेण्यापासून मागे हटणारे किंवा नाव परत घेणारे जस्टिस रमणा सुप्रीम कोर्टाचे तिसरे न्यायाधीश ठरले आहेत.
यापूर्वी एम नागेश्वर राव यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास जस्टिस सिकरी आणि त्याही पूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले नाव परत घेतले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे खंडपीठ त्यावर सुनावणी घेणार होते. परंतु, नवीन सीबीआय प्रमुख नियुक्त करण्यासाठी जी उच्चाधिकार समिती बैठक होणार त्याच समितीचे सरन्यायाधीश सदस्य आहेत. त्यामुळे आपण ही सुनावणी घेऊ शकणार नाही असे गोगोई यांनी जाहीर केले होते. त्यानंतरच द्विसदस्यीय खंडपीठात जस्टिस गोगोई यांच्या जागी जस्टिस सिकरी यांचे नाव सुचवण्यात आले होते. परंतु, जस्टिस सिकरी आणि त्यानंतर आता जस्टिस रमणा यांनीही सुनावणी घेण्यात असमर्थ असल्याचे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?
कॉमन कॉज नावाच्या एका एनजीओने सीबीआयच्या काळजीवाहू प्रमुख पदी एम नागेश्वर राव यांची नियुक्ती मनमानी कारभार आणि कायद्याच्या विरोधात जाऊन केल्याचे म्हटले आहे. याच कारणास्तव 23 ऑक्टोबर रोजी एम नागेश्वर राव यांची नियुक्त रद्द करण्यात आली. गेल्या महिन्यात सीबीआय प्रमुख आणि सीबीआय उप-प्रमुखांमध्ये वाद उफाळून आले. तेव्हा सीबीआय प्रमुखांना पदावरून दूर करण्यात आला. आता सीबीआयच्या काळजीवाहू प्रमुख पदी नियुक्ती कशी केली असा जाब याचिकेत विचारण्यात आला आहे.
Justice Ramana recuses from hearing plea challenging Interim CBI Chief Appointment

Post a Comment

 
Top