0
विद्याने 1 जानेवारी रोजी वयाची चाळिशी पूर्ण केली आहे.

एंटरटेन्मेंट डेस्कः बोल्डनेसमुळे इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विद्याने 1 जानेवारी रोजी वयाची चाळिशी पूर्ण केली आहे. 1 जानेवारी 1978 रोजी जन्मलेल्या विद्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने कधीही तिची पर्सनालिटी अनफिट असल्याचे सिद्ध होऊ दिले नाही. चित्रपटांमध्ये एकीकडे विद्याच्या सौंदर्याची प्रचिती येत असतानाच चाहत्यांना तिचे बोल्ड रूपही अनेकदा पाहायला मिळत असते. विशेषतः फोटोशूट्ससाठी विद्या बिनधास्त पोज देत असल्याचे आपल्याचा पाहायला मिळते. तिचे असेच काही फोटो आपण आज पाहणार आहोत.

स्वतःच्या फिगरबाबत वाईट वाटायचे...
विद्यालाही अनेकदा तिच्या फिगरमुळे टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे अनेकदा तिला मानसिक तणावही जाणवला. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत विद्याने या विषयावर मनमोकळेपणाने तिचे अनुभव सांगितले होते. विद्या म्हणाली होती, की जेव्हा ती 'घनचक्कर' चित्रपट करत होती, त्यावेली तिने खूप वेट गेमन केले होते. त्यावेळी विद्या स्वतःदेखील तिच्या लूकबाबत खूश नव्हती. हे सर्व 'डर्टी पिक्चर' या चित्रपटाच्या वेळी सुरू झाले. त्यावेळी त्या चित्रपटासाठी माझी बॉडी योग्य होती. पण नंतर सगळे माझ्या वजनाबाबत बोलू लागले. काही लोकांनी तर माझ्या फिगरमुळे मला एक्सेप्ट करायला स्पष्टपणे नाकारले होते.

विद्या म्हणाली की, मला आहे त्या रुपात सेक्सी मानणारा पार्टनर मिळाला याचा तिला आनंद आहे. पण तरीही आता व्यायामाबाबत पर्टिकुलर असून फिट राहत असल्याचे विद्या म्हणाली. विद्या तिच्या फॅटी लूकमुळे निराश होती पण त्यामुळे होणाऱ्या टीकांचा तिच्यावर फारसा परिणाम झाला नाही. आज मी माझ्या बॉडीवर प्रेम करते आणि मला त्याचा आनंद आहे असे विद्या म्हणाली.
Bollywood Actress Vidya Balans Beautiful Photos

Post a Comment

 
Top