0
मुंबई :

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदार संघाबरोबर महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवारासाठी नांदेड लोकसभा मतदार संघ सुरक्षित असल्याने तेथून किंवा मध्य प्रदेशातील एखाद्या जागेवरून राहुल यांना लढविण्यासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच राहुल  गांधी हे देखील दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मोदी लाटेत देखील महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदार काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश आले. त्यामुळे राहुल यांच्यासाठी नांदेडच्या जागेची चाचपणी केली जात आहे. या मतदार संघाचे विद्यमान खासदार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी देशातील कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतात. ते जेथून लढतील त्या ठिकाणाहून किमान 4 ते 5 लाखाच्या मताधिक्याने ते विजयी होतील, असा विश्‍वास व्यक्त केला.  राहुल गांधी महाराष्ट्रातून लढल्यास गुजरात, कर्नाटक, तेलगंणा या आजूबाजूच्या राज्यांतही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल. 1980 पासून नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. 1989 मध्ये जनता दल तर 2004 मध्ये भाजपा उमेदवार या ठिकाणाहून विजयी झाले होते.

Post a Comment

 
Top