0
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत मनसे युती करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलगा अमितच्या विवाहाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित केले आहे. 27 जानेवारीला मुंबईत अमितचा विवाह समारंभ पार पडणार आहे. मात्र, अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज यांनी निमंत्रण पाठवले नसल्याची माहिती मिळाली आहे.

दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत मनसे युती करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना मुलाच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी आपल्या दोन सचिवांना दिल्लीत पाठवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वत: दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांना निमंत्रित करण्याची राज ठाकरे यांची इच्छा होती. परंतु काही कारणास्तव राज यांना दिल्लीला जात आले नाही. मात्र, राज यांनी हर्षल देशपांडे आणि मनोज हाटे यांच्या हस्ते राहुल गांधी यांना मुलाच्या लग्नाचे निमंत्रण पाठविले आहे.

राज ठाकरे यांचे चिरंजिव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांच्यासोबत येत्या 27 जानेवारीला मुंबईत विवाह बंधनात अडकणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, रतन टाटा, राहुल गांधी, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना या विवाहाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. बॉलिवूड सेलेब्सलाही निमंत्रण करण्यात आले आहे.
Raj Thackeray Invites Rahul Gandhi to Son’s Wedding

Post a Comment

 
Top