0
नवी दिल्ली : 

अभिनेते कमल हासन यांचे अजूनही स्‍टारडम कमी झालेले नाही. तसे पाहिले तर त्‍यांचा प्रत्‍येक चित्रपट सुपरहिट होतो. आता आणखी एक सुपरहिट चित्रपट देण्‍यास कमल हासन तयार आहेत. परंतु, तत्‍पूर्वी तुम्‍हाला कमल हासन यांनी एका चित्रपटात साकारलेली वृध्‍दाची भूमिका आठवतेय का? ती भूमिका आजही लोकांच्‍या लक्षात आहे.

हो, आम्‍ही बोलत आहोत, कमल हासन यांच्‍या १९९४ मध्‍ये आलेला 'इंडियन' या चित्रपटाविषयी. आता पुन्‍हा एकदा कमल हासन ॲग्रेसिव्‍ह ओल्ड इंडियनच्‍या भूमिकेत दिसणार आहेत. तब्‍बल २५ वर्षे या चित्रपटाचा सीक्वल 'इंडियन-२' बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. 

निर्माते एस. शंकर यांनी मंगळवारी पोंगलच्‍या मुहूर्तावर 'इंडियन-२'ची पहिली झलक शेअर केली आहे. कमल हासन यांची यात प्रमुख भूमिका आहे.  शंकर यांनी एक ट्‍विट करून एक पोस्टर शेअर केला आहे आणि पोंगलच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. 

या पोस्टरवरून समजते की, चित्रपटाचे शूटिंग शुक्रवारपासून सुरू होणार आहे. १९९४ चा तमिळ चित्रपट 'इंडियन'च्‍या सीक्वलमध्‍ये काजल अग्रवाल मुख्‍य भूमिकेत आहेत. 

काजलने आपल्‍या भूमिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काजल म्‍हणाली, 'या चित्रपटाचा एक भाग बनून मी उत्‍साहित आहे. माझ्‍या भूमिकेमुळे मला बरेच काही शिकायला मिळणार आहे. 'इंडियन-२' हा चित्रपट माझ्‍यासाठी करिअरमधील महत्वाचा भाग आहे.' 

'इंडियन २'ला संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. चित्रपटात इतर कोणते कलाकार असतील, याबाबत अद्‍याप खुलासा झालेला नाही. या प्रोजेक्टवर दीर्घकाळ काम सुरू होते. या चित्रपटाबद्‍दल २०१७ मध्‍येही चर्चा होती. परंतु, कमल हासन बिझी असल्‍यामुळे हा चित्रपट करून शकले नव्‍हते. 


dinsta

Post a Comment

 
Top