गडहिंग्लज :
येथील नगरपरिषदेतर्फे दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शिल्पाकृती, शाल, श्रीफळ, मानपत्र देण्यात आले. तसेच यावेळी केक कापण्यात आला. गडहिंग्लज नगरपरिषद तसेच आजरा चंदगड तालुक्यातील सर्वपक्षीय व शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, पं. समिती सभापती विजयराव पाटील यांच्यासह पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव नागरी सत्कार समिती गडहिंग्लज-आजरा-चंदगडचे सदस्य उपस्थित होते. सत्कार कार्यक्रमाला डॉ. जाधव यांच्या कामगिरीवर नितांत प्रेम करणारे तिन्ही तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा कोरी आणि आ. संध्यादेवी कुपेकर यांनी पुढारीकार ग. गो. जाधव यांची परंपरा समर्थपणे पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव चालवत असल्याचे सांगितले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिते कार्य डॉ. जाधव भक्कमपणे पार पाडत असल्याचा गौरव त्यांनी केला. यानंतर दत्ता देशपांडे सर यांनी पद्मश्री डॉ. जाधव यांच्या मानपत्राचे वाचन केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सुरुवातीलाच आ. हसन मुश्रीफ यांच्या मातोश्रींना आदरांजली वाहिली. तसेच खा. पवार यांच्याहस्ते हा सत्कार होणे ही बाब अत्यंत सुखद असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment