0
मुंबई : 

'सैराट'च्या उत्तुंग यशानंतर आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा तिच्या फॅन्सना लागून राहिली आहे. आर्चीचा 'कागर' हा नवा चित्रपट येतोय. परंतु, या चित्रपटासाठी आता थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

'कागर' हा मराठी चित्रपट येत्या 'व्हॅलेंटाइन डे'ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला रिलीज होणार होता. पण, आर्चीमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. मकरंद माने दिग्दर्शित 'कागर' चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरंद माने यांचे ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ असे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दोन चित्रपट आहेत. 'कागर'ची निर्मिती सुधीर कोलते आणि विकास हांडे करत आहेत.

'सैराट'नंतर तब्बल दोन वर्षांनी आर्ची पाहायला मिळणार आहे. 'कागर' चित्रपटातल्या तिच्या एका गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रिंकू डान्स करत असताना दिसली. तसेच तिची शूटिंगच्यावेळी धम्माल-मस्तीही पाहायला मिळाली होती. रिंकूने आपल्या पर्सनॅलिटित बदल केला आहे. रिंकू अनेकदा विविध कार्यक्रमात स्पॉट झाली होती. त्यावेळी तिने आपले वजन घटवल्याचे दिसले होते. 'कागर'च्या गाण्यातील व्हिडिओत ती स्लिम दिसत आहे. 'कागर'मध्ये मुख्य भूमिकेत कुठला अभिनेता असेल, हे अद्याप समजलेले नाही.

रिंकूची यंदा बारावीची परीक्षा आहे. त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट टळली आहे. फेब्रुवारीमध्ये बारावीची परीक्षा होत असून तिने अभ्यासाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलली आहे.


Post a comment

 
Top