0
पुणे :

कौटुंबिक वादातून पोटच्या अडीच वर्षाच्या चिमुकलीचा आणि पत्नीचा चाकूने वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी पहाटे ताडीवाला रोडवर ही घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

अलिना शेख (अडीच वर्ष) व पत्नी तबससुम शेख (२७) अशी खून झालेल्याचे नावे आहेत. याप्रकरणी पती आयाज शेख याला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार घरघुती वादातून घडला असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

 
Top