सातारा :
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक गजानन कदम व संतोष चौधरी या दोन अधिकार्यांना पोलिस महासंचालकांचे ‘विशेष सेवा पदक,’ तर दोन सहायक फौजदार मोहन घोरपडे व पुरुषोत्तम देशपांडे यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर झाले आहे. दरम्यान, या चारही पोलिसांवर पोलिस दलातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सपोनि गजानन कदम हे गेल्या तीन वर्षांपासून सातारा पोलिस दलात कार्यरत असून, सध्या त्यांच्याकडे सायबर पोलिस ठाण्याचा चार्ज आहे. यापूर्वी त्यांनी गडचिरोली येथे सेवा बजावलेली आहे. गडचिरोलीतील विशेष सेवेसाठीच त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहेे. फौजदार म्हणून भरती झाल्यानंतर त्यांनी मुंबई, गडचिरोली व सध्या सातारा येथे सेवा बजावत आहेेत. सपोनि संतोष चौधरी यांच्याकडे सध्या बोरगाव पोलिस ठाण्याचा चार्ज आहे. गडचिरोली येथील सेवेसाठीच त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहेे. यापूर्वी त्यांनी औरंगाबाद तेथून गडचिरोली व सध्या सातारा-बोरगाव येथे सेवा बजावत आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्यांमध्ये सहायक फौजदार मोहन घोरपडे हे सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागात कार्यरत आहेत. सातारा पोलिसमध्ये ते 1984 साली भरती झाले असून ते मूळचे गोजेगाव (ता. सातारा) येथील आहेत. पोलिस खात्यामध्ये काम करत असताना त्यांना पदोन्नती मिळत गेली व त्यानुसार ते सहाय्यक फौजदार पदापर्यंत पोहचले आहेत. पोलिस मुख्यालय, वाई, बोरगाव, उंब्रज येथे त्यांनी सेवा केली आहे. विविध गुन्ह्यांचा केलेला तपास व वाई हत्याकांडासंबंधी त्यांनी बजावलेली कामगिरी ही उल्लेखनीय राहिली आहे. सेवा कालावधीत त्यांना एकूण 800 रिवॉर्ड (बक्षिसे) मिळालेली आहेत.
राष्ट्रपती पदक जाहीर झालेले दुसरे सहाय्यक फौजदार विजय उर्फ पुरुषोत्तम देशपांडे हे 1984 साली सातारा पोलिस दलात भरती झाले. ते मुळचे मेढा ता.जावली येथील आहेत. एलसीबी, भुईंज महामार्ग पोलिस मदत केंद्र येथे त्यांनी सेवा केली आहे. घोरपडे व देशपांडे हे दोघेही एकाच बॅचचे आहेत. शुक्रवारी पदके जाहीर झाल्यानंतर सातारा पोलिस दलातून चारही पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment