राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यात खंडपीठात सरकारी पक्षाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उमेशचन्द्र यादव यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.
कोपर्डी खटल्यातील जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ यांना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेविरोधात आरोपींच्यावतीने खंडपीठात अपील करण्यात आले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने बाजू लढविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी उमेशचंद्र यादव यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार यादव यांची या खटल्यात बाजू मांडण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment