0
मुंबई :

करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण'मध्‍ये हार्दिक पांड्‍या आणि केएल राहुल यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याने वादात अडकले आहेत. यानंतर हार्दिक आणि राहुल सोशल मीडिया युजर्सच्‍या निशाण्‍यावर आले आहेत. अनेकांनी त्‍यांना कॉमेंट्‍सही दिल्‍या आहेत. ट्‍विटर आणि इन्‍स्‍टाग्रामवरून त्‍यांना युजर्सनी खरे-खोटेही सुनावले. हार्दिकची तथाकथित गर्लफ्रेंड ईशा गुप्‍तानेही आपल्‍या प्रतिक्रिया दिल्‍या होत्‍या. आता हार्दिकची एक्‍स गर्लफ्रेंड एली अवरामनेही प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

वाचा : हार्दिक पांड्‍याच्‍या कॉमेंट्‍सवर भडकली 'ही' अभिनेत्री

एलीचे नाव हार्दिक पांड्‍याशी जोडले गेल्‍यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्‍याची चर्चा सुरू झाली होती. हार्दिक आणि एली अनेकवेळा एकत्र स्‍पॉट झाले होते. एलीने हार्दिकच्‍या भावाच्‍या लग्‍नालाही हजेरी लावली होती. त्‍यावेळी एली-हार्दिकचे फोटोही व्‍हायरल झाले होते.

Post a Comment

 
Top