0
१ लाख १४ हजाराचा मुद्देमाल : मध्यप्रदेशच्या दोघांना अटक

ठळक मुद्दे
शिरपूरला पकडला ४५ किलो गांजा
१ लाख १४ हजाराचा मुद्देमाल, दोघांना अटक

: लक्झरीच्या डिक्कीत ठेवण्यात आलेला ४५ किलो ८५ ग्रॅम वजनाचा गांजा शिरपूरकडून पुण्याकडे जात असताना शिरपूर पोलिसांनी पकडला़ शिरपूर बसस्टँडजवळील चोपडा जिन समोरील हॉटेल समोरील सार्वजनिक जागेवर विजय ट्रॅव्हल्सची एमएच १८ बीजी २९५१ या क्रमांकाची लक्झरीच्या डिक्कीची तपासणी केल्यावर प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये गांजा दाबून भरलेला पोलिसांना आढळून आला़ ही कारवाई शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झाली़ रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली़ याप्रकरणी दीपक घाटूसिंग बारेला (४०) आणि राजा दुर्गा बारेला (२८) (दोन्ही रा़ काबरी, ता़ भगवानपुरा, जि़ खरगोन, मध्यप्रदेश) या दोघांना संशयावरुन अटक करण्यात आली़ त्यांच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला़ सहायक पोलीस निरीक्षक एस़ बी़ वाघ घटनेचा तपास करीत आहेत़45 kg of Ganja which went to Pune caught Shirapur | पुण्याकडे जाणारा ४५ किलो गांजा शिरपूरला पकडला

Post a Comment

 
Top