मुंबई :
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा कालावधी आज संपणार आहे. दीपक सावंत शिवसेनेच्या कोटयातून मंत्री होते. डॉ. सावंत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपली. त्यानंतरही ते मंत्रिपदावर कार्यरत होते.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी ४ जुनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांचा पत्ताकट करण्यात आला होता. पोतनीस यांनी पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि युवासेनेमध्ये मोठी नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

Post a Comment