0
बॉलिवूडपासून ते राजकारण आणि क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी कादर खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूड डेस्कः चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. कॅनडातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 81 वर्षीय कादर खान यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना न्युमोनिया झाला होता. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. कॅनडा येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


31 डिसेंबर रोजी झाले निधन : सरफराजने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, कादर खान यांनी कॅनडातील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार महिन्यांपासून ते रुग्णालयात होते.


दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली : 2019 च्या पहिल्याच सकाळी आलेल्या या दुःखद बातमीने सगळे हळहळले आहेत. बॉलिवूडपासून ते राजकारण आणि क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी कादर खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Amitabh Bachchan, Anupam Kher, Arjun Kapoor Bollywood celebrities mourn Kader Khan demise

Post a Comment

 
Top