0
सांगली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या खाटांचा शोध सुरू केला.
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या खाटांचा शोध सुरू केला. आमराई, कुपवाडमधील कार्यालयांसह अन्य ठिकाणी या खाटा आढळून आल्याने संतप्त झालेल्या थोरात यांनी प्रशासनाला धारेवर धरत या खाटा पुन्हा प्रसुतिगृहात हलविण्यास भाग पाडले.

महापालिकेच्या प्रसुतिगृहातील तीन खाटा आमराईतील विश्रामधाममध्ये लेखापरीक्षणासाठी आलेल्या लेखापरीक्षकांना देण्यात आल्या होत्या. त्या खाटा तीन वर्षांपासून तेथे होत्या. दोन खाटा निवडणुकीदरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी अन्य विभागांकडे हलविल्या होत्या. एक खाट महिला बालकल्याण विभागाकडे देण्यात आली होती. यामुळे रुग्णालयात खाटांअभावी रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत होते.

याबाबत थोरात म्हणाले, सांगलीच्या प्रसुतिगृहाचे कामकाज केवळ दहाजणांवर सुरू आहे. या रुग्णालयात दोन प्रसुती विभाग तज्ज्ञ आहेत. मिरजेत तर तज्ज्ञही नाहीत. दोन्ही ठिकाणची आॅपरेशन थिएटर धूळ खात पडली आहेत. मिरजेतील आॅपरेशन थिएटरवरील पत्रे गायब आहेत. तेथे जाळी बसविण्यात आली आहे.

औषधांचाही पुरवठा व्यवस्थित केला जात नाही. त्यात प्रसुतिगृहातील खाटाच गायब करण्याचा प्रकार प्रशासनाकडून झाला आहे. ही बाब निदर्शनास येताच डॉ. कवठेकर, डॉ. सुनील आंबोळे, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांना घेऊनच गायब खाटांची शोधमोहीम सुरू केली.

या खाटा आमराई, कुपवाड येथून कुलपे तोडून महापालिकेच्या रुग्णवाहिकेद्वारे परत आणल्या. रुग्णालयातील खाटा गायब होणे, हा प्रकार लाजिरवाणा आहे. आरोग्य विभागाचा असा कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.Six slots disappeared due to the Sangli municipality's hostel | सांगली महापालिका प्रसुतिगृहातून सहा खाटा झाल्या गायब

Post a Comment

 
Top