0
ऑस्ट्रेलियाच्या २९९ धावांचा पाठलाग करताना सलमीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ४७ धावांची भागिदारी रचल्यानंतर चांगल्या टचमध्ये दिसणारा शिखर धवन बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. शिखरने आक्रमक फलंदाजी करत कही आकर्षक फटके मारले. त्याने २८ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. शिखर बाद झाल्यावर आलेल्या चेस मास्टर विराट कोहली आणि रोहित शर्माने भारताची धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताचे शतक धावफलकावर लावले. ही जोडी दुसऱ्या विकेसाठी मोठी भागिदारी रचणार असे वाटत असतानाच स्टॉयनिला पूल मारण्याचा रोहितचा प्रयत्न फसला आणि तो ४३ धावांवर झेलबाद झाला.


रोहित बाद झाल्यावर धावगती वाढण्याची जबाबदारी विराटने आपल्या शिरावर घेतली. त्याने भारताची ५ च्या वर असलेला रनरेट खाली येऊ दिला नाही.

शॉन मार्शच्या शानदार १३१ धावांच्या शतकी खेळीमुळे दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २९९ धावांचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर शॉन मार्शने एक बाजू लावून धरली. त्याने ख्वाजा, हँडस्कब, स्टॉयनिस आणि मॅक्सवेल यांच्याबरोबर अर्धशतकी भागिदाऱ्या रचल्या. या भागिदाऱ्यांमुळेच ऑस्ट्रेलिया २९८ धावांपर्यंत पोहचला. शॉन मार्श व्यतिरिक्त इतर फलंदाजांना चांगली सुरुवात करुनही अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. मार्शनंतर मॅक्सवेलने ४८ धावांची खेळी केली पण, त्यालाही अर्धशतक पूर्ण करता आले नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत ४५ धावा देत ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज तंबूत धाडले. त्याला शामीने ३ कांगारुंना बाद करत चांगली साथ दिली. 

भारतासाठी मस्ट विन असणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ॲडलेडच्या उष्ण वातावरणात हा निर्णय अपेक्षितच होता. पण, कांगारुंच्या बॅटिंग पिचवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या मनसुब्यांना भुवनेश्वर आणि शामी या जलदगती जोडीने सुरुंग लावला. या दोघांनीही दोन्ही सलामीवीरांना पाठोपाठ तंबूत पाठवले.   भुवनेश्वरने कर्णधार फिंचचा ६ धावांवर त्रिफळा उडवत पहिला धक्का दिला. तर शामीने ॲलेक्स केरीला धवनकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. यामुळे कांगारुंची ८ षटकात २ बाद २६ धावा अशी अवस्था झाली.

दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर आलेल्या शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली. पण ही भागिदारी फुटली ती जडेजाच्या डायरेक्ट हीटने जडेजाने ख्वाजाचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला २१ धावांवर रनआऊट केले. यानंतर आलेल्या हॅडस्कबच्या साथीने शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाचे शतक स्कोरबोर्डवर लावले. शॉन मार्शने आपले अर्धशतक पूर्ण करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

शॉन मार्शने एक बाजू लावून धरली असताना दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने फलंदाज बाद होत होते. आता गेल्या सामन्यात ७३ धावांची खेळी करणाऱ्या हँडस्कबने २० धावा करत शॉन मार्शची साथ सोडली. तो जडेजाच्या फिरकीत फसला. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉयनिसने मार्शबरोबर पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली. दरम्यान, शॉन मार्श आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. ही भागिदारी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच शामी पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला. त्याने स्टॉयनिसला २९ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

स्टॉयनिस बाद झाल्यावर धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल क्रिजवर आला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आपल्या २०० धावा पूर्ण केल्या. याच बरोबर शॉन मार्शनेही आपले वनडेमधील आपले सातवे शानदार शतक पूर्ण केले. अखेरची १० षटके राहिलेली असताना क्रिजवर एक सेट फलंदाज आणि एक धडाकेबाज फलंदाज असल्याने ऑस्ट्रेलिया आता आक्रमक खेळणार या काही शंकाच नव्हती. मॅक्सवेलने ४३ वे षटक टाकणाऱ्या कुलदीप यादवच्या एकाच षटकात दोन षटकार मारत आपले मनसुबे जाहीर केले. 

मार्श आणि मॅक्सवेल यांनी अखेरच्या काही षटकात आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, रोहितने धोकादायक मॅक्सवेलला सिराजच्या गोलंदाजीवर जीवनदान दिले. सुदैवाने हे जीवनदान फार धोकादायक ठरले नाही. कारण, भुवनेश्वरने मॅक्सवेलला ४८ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ भुवीने शॉन मार्शची १३१ धावांची शानदार शतकी खेळीही त्याच षटकात संपवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ४८ षटकात ७ बाद २८३ धावा झाल्या. अखेरची दोनच षटके शिल्लक असताना दोन नवीन फलंदाज क्रिजवर आल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला ब्रेक लागला. सिडल ० तर  रिचर्डसन १ धावांची भर घालून माघारी परतले. त्यानंतर लायनने अखेरच्या तीन चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारल्याने ऑस्ट्रेलियाला भारतासमोर २९९ धावांचे आव्हान ठेवता आले.*भारताच्या २३ षटकात २ बाद १२१ धावा

*भारताला दुसरा धक्का; रोहित शर्मा ४३ धावांवर बाद

*भारताच्या १५ षटकात १ बाद ८२ धावा

*भारताच्या ७.४ षटकांत १ बाद ४७ धावा

*भारताला पहिला धक्का; शिखर धवन ३२ धावांवर झेलबाद

*शिखर, रोहित मैदानात; बेहरनफॉर्ड गोलंदाजीची सुरुवात करणार 

*ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २९९ धावांचे आव्हान ठेवले

Post a Comment

 
Top