0
फुलबनी (ओडिशा) :

आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षाच्या शाळकरी मुलीची शासकीय वसतिगृहातच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील एका आदिवासी विद्यार्थी वसतीगृहात घडली आहे. या प्रकरणी निवासी शाळेतील सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर विद्यार्थीनीला आणि तिच्या बाळाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

कंधमाल जिल्ह्यात दरिंगबाडी येथे ओडिशा राज्य शासनाच्या आदिवासी आणि ग्रामीण विकास विभागाकडून सेवा आश्रम नावाचे हायस्कूल चालविले जाते. या शाळेतील १४ वर्षाच्या विद्यार्थीनीची शनिवारी रात्री वसतीगृहात प्रसूती झाली, अशी माहिती कंधमाल जिल्हा कल्याण अधिकारी चारुलता मलिक यांनी दिली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत संस्थेचे २ मेटनर्स, २ स्वयंपाकी, महिला पर्यवेक्षक यांच्यावर कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.  

Post a Comment

 
Top