0
८७ वर्षीय आचरेकरांकडून सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीने गिरवले पहिले धडे

मुंबई- क्रिकेटचा 'देव' सचिन तेंडुलकरला घडवणारे थोर प्रशिक्षक रमाकांत आचरेकर (८७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी सचिनव्यतिरिक्त विनोद कांबळी, समीर दिघे, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यासारखे अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडवले. सचिन ११व्या वर्षापासूनच त्यांच्याकडून धडे घेत हाेता. पद‌्मश्री, द्रोणाचार्य पुरस्काराने आचरेकरांचा गाैरव झाला हाेता. गुरूच्या निधनाने गहिवरलेला सचिन म्हणाला, 'आता स्वर्गातही क्रिकेटचे तेज तळपेल... कारण माझे गुरू आचरेकर आता तिथेही पोहोचले आहेत...'

चार कथांमधून जाणून घेता येईल सचिन नेमका कसा घडला....
समर्पण :
एकाच दिवशी २ ते ३ सामन्यांत सचिनला नेत असत
एका सामन्यात सचिन बाद झाला तर आचरेकर सर त्याला इतर मैदानांवर नेऊन खेळायला लावत. इतर मुलांचे नुकसान नकाे म्हणून सचिनला ५० धावांपेक्षा अधिक फलंदाजीची परवानगी नव्हती.

प्रोत्साहन :
सामन्यानंतर वडापाव दिला म्हणजे उत्तम खेळी केली
सचिन सांगतो की, कितीही उत्तम खेळी केली तर सर कधीही खेळाडूला वेल-प्लेड असे म्हणायचे नाही. पण सामन्यानंतर त्यांनी वडापाव खाऊ घातला की आपण चांगला खेळ केल्याचे मला आपोआप समजून जात होते.

वचनबद्धता :
सचिन, आचरेकर सर अन् स्टम्पवर ठेवलेले नाणे...
सचिन सराव करायचा तेव्हा आचरेकर स्टम्पवर नाणे ठेवायचे. शेवटपर्यंत सचिन नाबाद राहिला तर नाणे त्याला मिळायचे, अन्यथा त्याला बाद करणाऱ्याला. सचिनजवळ अशी १३ नाणी आहेत.

प्रेरणा :
आचरेकर म्हणायचे, 'तुला टाळ्या मिळवायच्या आहेत'
१४ वर्षीय सचिनला आचरेकरांनी ज्युनियर सामन्यात खेळण्यास सांगितले. पण सचिन सीनियर सामना पाहण्यास गेला. त्यांनी सचिनला चापट मारली अन् तुला दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवायच्या नाहीत, तर मिळवायच्या आहेत, असे म्हटले.
News about death of Guru Ramakant Aachrekar

Post a Comment

 
Top