सायबर पोलिसांकडून केली जात आहे प्रभावी जनजागृती
नाशिक : राज्यात आणि देशात विविध उद्योग समूहात आणि आता शासनाने जम्बो भरती करण्याचे जाहीर केली आहे. या नोकरभरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बेरोजगारांकडून कॉल सेंटर, सायबर कॅफेमध्ये गर्दी होत आहे. या तरुणांच्या मानसिकतेचा फायदा समाजातील अपप्रवृत्ती घेत आहते. बेरोजगार तरुणांना फसवण्याचा ऑनलाइन 'स्वयंरोजगार' व्यवसाय थाटला आहे. या तरुणांची फसवणूक होऊ नये यासाठी सायबर पोलिसांकडून प्रभावी जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध खात्यात भरतीच्या जाहिरात प्रसिद्ध झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने तरुणांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. याचा फायदा समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनी घेतला आहे. शासनाच्या आणि खासगी कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच बोगस संकेतस्थळ तयार करत तरुणांची दिशाभूल करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच हुबेहूब बोगस संकेतस्थळ असल्याने हे संकेतस्थळ गुगलवर सहज उपलब्ध होत आहे. या आधारे तरुणांनी बोगस संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर काही दिवसांत संबंधीत अर्जदाराला त्याच्या इ-मेलवर ऑफर लेटर प्राप्त होते. यामध्ये ५० ते ६० हजार वेतन असल्याचे सांगत निवड झाल्याचे ऑफर लेटर पाठवले जाते. तसेच सुरवातीला नोंदणी फी म्हणून कमी रक्कम सांगितली जाते. नोकरी मिळण्याचा आशेचा किरण दिसत असल्याने संबंधित बेरोजगार सहजपणे या ठगाच्या ऑफर्सला बळी पडतात आणि आपली सर्व माहिती या ठगांना पाठवून देतात. यानंतर फोनद्वारे, इ-मेलद्वारे, आणि तसेच कंपनीच्या फोन द्वारे विविध कारणे सांगत राष्ट्रीयीकृत बँकेत पैस भरण्यास सांगितले जाते. रक्कम भरल्यानंतर संबंधित खाते बंद होते. त्यानंतर संशयिताचे नंबर बंद हाेतात. फसवणूक झाल्याचे लक्षात येते मात्र तोपर्यंत बराच कालावधी उलटून गेलेला असतो.
ऑफर लेटर आल्यास सतर्क व्हा
नोकरीचा अर्ज भरल्यानंतर काही दिवसांनी ऑफर लेटर आल्यास सतर्क व्हा. ज्या ठिकाणी अर्ज केला होता. त्या कंपनीमध्ये प्रत्यक्ष जाऊन चौकशी करा. कुणी पैशांची मागणी करत असल्यास खबरदारी घ्या. तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा. ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित संकेतस्थळासंबंधी खात्री करूनच अर्ज करा. ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगत असल्यास फसवणूक अटळ असल्याचे समजा. - कमलाकर जाधव, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

Post a Comment