0
पिंपरी :

पिंपरी चिंचवड महापालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि संतपीठाच्या कामासाठीच्या वाढीव खर्चाच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पालिकेसमोर टाळ कुटो आंदोलन करण्यात आले. आयुक्त हाय हाय, या सत्ताधारी भाजपचं करायचं काय खाली डोकं वर पाय, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. चिखली येथे पालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वाढीव खर्चावर राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. या विषयावर युवक राष्ट्रवादीच्या वतीने पालिकेसमोर टाळ कुटो आंदोलन करण्यात आले. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून मनपा भवनपर्यंत मोर्चा काढून तेथे ठिय्या देण्यात आला. या आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका अनुराधा गोफणे, विनया तापकीर, उषा काळे, निकिता कदम, युवकचे विशाल वाकडकर, विशाल काळभो , तुकाराम बजबळकर, आलोक गायकवाड, सेवा दलाचे आनंदा यादव आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

 
Top