चरसची विक्री करणाऱ्या एकाला ठाणे पोलिसांनी अटक केली. अजीमुद्दीन अहमद अन्सारी (५८) असे अटक करण्यात आलेल्या या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी २२ लाख रुपये किमतीचे ११ किलो चरस जप्त केले आहे.
पोलिस प्रवक्त्या सुखदा नारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारीने नेपाळमधून चरस आणले होते. तो बसने कल्ल्याण येथे आला. ठाणे खंडणीविरोधी पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात ११ किलो चरस आढळून आले. या चरसची बाजारात २२ लाख रुपये किंमत आहे.
अटक करण्यात आलेला अन्सारी हा बिहारमधील सिवान जिल्ह्यातील असून, अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५, ८ (सी) २७ अन्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अन्सारीकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.

Post a Comment