0
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून साधू, संत दाखल झाले आहेत. मकर संक्रांतीनिमित्त मंगळवारी (दि. १५) गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमस्थळी नागा साधू आणि अन्य अखाड्याचे साधू, संत आदींनी शाही स्नान केले. यावेळी १ कोटींहून अधिक भाविकांची गर्दी केली. संगमावरील पवित्र स्नानानंतर कुंभमेळ्याची श्रीगणेशा झाली आहे. 


महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. रामकृष्ण लहवीतकर महाराज व त्यांचे अनुयायीही शाही स्नानात सहभागी झाले आहेत. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सुमारे ४५ एकर क्षेत्रामध्ये साधुग्राम म्हणून अस्थायी शहर वसविले आहे. त्यात विविध आखाडे व त्यांचे महंत, महामंडलेश्‍वर यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहे. 

Post a Comment

 
Top