0
मुंबई : 

‘भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्‍या आयुष्‍यावर लिहिण्‍यात आलेल्‍या पुस्‍तकावर (लेखक - संजय बारू) आधारित 'द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर' हा सिनेमा ११ जारेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. परंतु, ट्रेलर प्रदर्शित झाल्‍यापासून तीनच दिवसांत हा सिनेमाइंटरनेटवर लिक झाला आहे. देशातील विविध भाषांमध्ये हा सिनेमा करण्यात आला आहे. यातील सिनेमाचे पाइरेटेड वर्जन लिक झाले आहे.

 'द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्‍यापासूनच तो वादात सापडला आहे. काँग्रेसने या सिनेमावर आक्षेपही घेतला आहे. त्‍यासाठी विविध भागात आंदोलने करुन विरोधही करण्यातही करण्यात आला. काँग्रेस पक्षाची आणि गांधी घराण्याची या सिनेमातून बदनामी होत असल्‍याचा आरोप काँग्रेसने केला आहे. परंतु, काँग्रेसचा विरोध झुगारुन सिनेमा प्रदर्शित करण्यात आला.

तामिळ रॉकर्स  (Tamilrockers) या वेबसाईटवर हा सिनेमा लिक झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्‍यापासून तिनच दिवसात लिक झाल्‍यामुळे बॉक्‍स ऑफिसवर चांगलेच नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

दरम्‍यान, या वेबसाईटवरुन लिक होणारा हा पहिला सिनेमा नसून याआधीही अनेक सिनेमे लिक झाले आहेत. यात रजीकांत यांचा ‘पेट्टा’, अमिताभ बच्चन आणि अमिर खान यांचा ‘ठग्‍स ऑफ हिन्दोस्‍तान’, रनबीर कूपरचा ‘संजू’ यासह अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याच्या काही तासातच लिक झाले आहेत. या साईटवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, याच साईटवरुन दुसऱ्या डोमेनचा वापर करुन सिनेमे लिक होत आहेत.

Post a Comment

 
Top