चंद्रपूर :
जनावरे घेऊन जात असलेल्या वाहनांना थांबवत असताना भरधाव वेगात असलेल्या वाहनाने पोलिस शिपायाला उडवल्याची घटना वरोरा तालुक्यातील माजरी येथे घडली. यात पोलिस शिपायाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. प्रकाश मेश्राम असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे.
जानावरे घेऊन वणीवरून नागपूरकडे घेऊन जात असलेल्या गाडीला खांबाडा गावाजवळ नाकाबंदी दरम्यान तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, भरधाव वेगात असलेल्या वाहनाने पोलिस शिपाई प्रकाश मेश्राम यांना उडवले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धडक मारुन पळून गेलेल्या वाहन चालकाला वाहनासह नागपूर येथील गिट्टीखदान या परिससरात पकडण्यात आले आहे. इम्तियाज अहमद फैय्याज (१९), मोहम्मद रजा अबुल जब्बार कुरेशी (वय १९, दोघेही राहणार नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे.
प्रकाश मेश्राम हे भद्रावती पोलिस ठाण्यात शिपाई होते. सोमवारी त्यांची नाकाबंदीसाठी खांबाडा येथे ड्युटी लागली होती. कर्तव्य बजावत असताना प्राण गेल्याने पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नागभीड जवळ नाकाबंदी दरम्यान पोलिस उपनिरीक्षकांना अवैध दारू घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाने उडवल्याची घटना ताजी असतानाच आता अजून एक घटना घडल्याने पोलिस प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे.

Post a Comment